जयश्री पाटील फरार; सरकारी वकिलांचा दावा

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील ऍड. गुणरत्न सदावर्ते यांना गिरगाव सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सदावर्तेंची दोन दिवसांची कोठडी संपली असून त्यांच्या कोठडीवर आज सुनावणी पार पडली. याप्रकरणी न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतला. दरम्यान, सरकारी वकिलांनी न्यायालयात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. गुणरत्न सदावर्ते यांची पत्नी ऍड. जयश्री पाटील फरार असल्याचा दावा सरकारी […]

जयश्री पाटील फरार; सरकारी वकिलांचा दावा

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील ऍड. गुणरत्न सदावर्ते यांना गिरगाव सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सदावर्तेंची दोन दिवसांची कोठडी संपली असून त्यांच्या कोठडीवर आज सुनावणी पार पडली. याप्रकरणी न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतला. दरम्यान, सरकारी वकिलांनी न्यायालयात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. गुणरत्न सदावर्ते यांची पत्नी ऍड. जयश्री पाटील फरार असल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला आहे.

सरकारी वकील म्हणाले, गुणरत्न सदावर्ते यांना कर्मचाऱ्यांकडून रक्कम गोळा करून दोन कोटी रुपये जमवले. ही रक्कम त्यांनी पत्नी जयश्री पाटील यांच्याकडे देण्यात आली होती. मात्र, आता जयश्री पाटील फरार असल्याचा धक्कादायक दावा सरकारी वकिलांनी केला आहे.

तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवसास्थानावरील हल्ल्याच्या प्रकरणावरून आता आर्थिक घोटाळ्याच्या दिशेला वळत असल्याचेही सरकारी वकिलांनी सांगितले आहे.

गिरगाव न्यायालयावर गुणरत्न सदावर्ते यांच्या कोठडीवर सुनावणी पार पडली असून दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवाद केला. दरम्यान, न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच सदावर्ते यांची रवानगी आर्थर रोड तुरुंगात झाली आहे.

सदावर्तेंचा ताबा सातारा पोलिसांकडे

ऍड. गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून आता त्यांचा ताबा सातारा पोलिसांकडे देण्यात आला आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात साताऱ्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. उदयनराजे भोसले यांच्याविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप सदावर्तेंवर करण्यात आला आहे. त्यामुळे सदावर्ते यांचा ताबा घेण्यासाठी सातारा पोलीस मुंबईत आले होते. दरम्यान, सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांकडे देण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number