शिवराज नारियलवाले मारहाण प्रकरणी ५ पोलीस निलंबित

जालना :भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे सरचिटणीस शिवराज नारियलवाले यांना जालन्यातील दीपक हॉस्पिटलमध्ये झालेल्या अमानूष मारहाणीचा व्हीडिओ समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाला होता. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह ५ पोलिस कर्मचारी सोमनाथ लहानगे, नंदकिशोर ढाकणे, सुमित सोळंके, महेंद्र भारसाकळे यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी ही निलंबनाची कारवाई केली आहे काय आहे प्रकरण? शिवराज नारियलवाले […]

शिवराज नारियलवाले मारहाण प्रकरणी ५ पोलीस निलंबित

जालना :भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे सरचिटणीस शिवराज नारियलवाले यांना जालन्यातील दीपक हॉस्पिटलमध्ये झालेल्या अमानूष मारहाणीचा व्हीडिओ समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाला होता. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह ५ पोलिस कर्मचारी सोमनाथ लहानगे, नंदकिशोर ढाकणे, सुमित सोळंके, महेंद्र भारसाकळे यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी ही निलंबनाची कारवाई केली आहे

काय आहे प्रकरण?

शिवराज नारियलवाले हे दीपक हॉस्पिटलमध्ये आपल्या बहिणीला उपचारासाठी घेऊन गेले होते. त्याच सुमारास गवळी समाजाचा एका युवकाचा अपघाती मृत्यू तेथे झाला आणि त्यामुळे तेथे काही लोक तेथे धुडघूस घालत होते. त्यावेळी तेथे उपस्थित काही पोलीस हे अतिशय अर्वाच्य शब्दात शिविगाळ करीत असल्याने शिवराज नारियलवाले यांनी पोलिसांची ही शिविगाळ आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केली.
व्हीडिओ काढल्याच्या रागातून पोलिसांनी त्यांना मारहाण केली, असे व्हायरल व्हीडिओत स्पष्ट दिसत आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number