Thane Municipal Corporation: ठाकरे गटाच्या खेळीने शिंदे गटाच्या 9 नगरसेवकांची खुर्ची धोक्यात? दिव्याच्या राजकारणात नेमकं काय शिजतंय? वाचा

निवडणूक शपथपत्रात मालमत्ता आणि आर्थिक बाबींची खोटी माहिती दिल्याचा दावा करत ठाकरे गटाने शिंदे गटाच्या नऊ नगरसेवकांविरुद्ध न्यायालयीन लढाई सुरू केली आहे.

Thane Municipal Corporation: ठाकरे गटाच्या खेळीने शिंदे गटाच्या 9 नगरसेवकांची खुर्ची धोक्यात? दिव्याच्या राजकारणात नेमकं काय शिजतंय? वाचा

Thane Municipal Corporation: दिव्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता दिव्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणूक शपथपत्रात मालमत्ता आणि आर्थिक बाबींची खोटी माहिती दिल्याचा दावा करत ठाकरे गटाने शिंदे गटाच्या नऊ नगरसेवकांविरुद्ध न्यायालयीन लढाई सुरू केली आहे. या कायदेशीर पेचामुळे निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या नगरसेवक पदावर अपात्रतेची टांगती तलवार निर्माण झाली आहे.

नेमका वाद काय?
2026 च्या ठाणे महापालिका निवडणुकीत दिवा परिसरातून शिंदे गटाचे अनेक उमेदवार विजयी झाले. मात्र, यापैकी नऊ नगरसेवकांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात मालमत्तेचा तपशील, अनधिकृत बांधकामे आणि आर्थिक व्यवहारांची माहिती दडवून मतदारांची दिशाभूल केल्याचा आरोप ठाकरे गटाचे पदाधिकारी अॅड. रोहिदास मुंडे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी ठाणे न्यायालयात 'इलेक्शन रिट पिटीशन' दाखल केले आहे.

या नऊ नगरसेवकांच्या अडचणीत वाढ:
अॅड. मुंडे यांनी ज्या नगरसेवकांविरुद्ध याचिका दाखल केल्या आहेत, त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
1. रमाकांत मढवी
2. शैलेश पाटील
3. आदेश भगत
4. दीपक जाधव
5. साक्षी मढवी
6. दर्शना म्हात्रे
7. अर्चना पाटील
8. दीपाली भगत
9. स्नेहा पाटील

कायदेशीर बाजू काय सांगते?
लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार, उमेदवाराने आपली सर्व सत्य माहिती जाहीर करणे बंधनकारक आहे. "तथ्य लपवणे हा गंभीर गुन्हा असून, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अशा लोकप्रतिनिधींची निवडणूक रद्द केली जाऊ शकते," असे अॅड. मुंडे यांनी कायदेशीर तरतुदींचा हवाला देत स्पष्ट केले.

हेही वाचा – Chhatrapati Sambhajinagar AIMIM fraud : एमआयएमला आणखी एक धक्का; तिसरे अपत्य लपवणे पडले चांगलेच महागात

शिंदे गटाचे चोख प्रत्युत्तर; आरोपांचे केले खंडन
दरम्यान, ठाकरे गटाचे हे सर्व दावे शिंदे गटाने फेटाळून लावले आहेत. नगरसेवक अॅड. आदेश कमलाकर भगत यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, "हा केवळ पराभवाचा राग आहे. केवळ वैफल्यातून अशा बिनबुडाच्या याचिका दाखल केल्या जात आहेत. आम्ही न्यायालयासमोर आमची सत्य बाजू मांडू आणि आम्हाला खात्री आहे की विजय आमचाच होईल." दिव्यातील या कायदेशीर लढाईत आता न्यायालय काय निकाल देते, याकडे संपूर्ण ठाणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number