विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवाशी सत्ताधारी नेते आणि विरोधक यांच्यात जुंपत झाली. या अधिवेशनादरम्यान शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केल्यामुळे विरोधकांनी विधानसभेत आवाज उठवला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भास्कर जाधवांनी माफी मागण्याची मागणी केली आहे.
शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी पंतप्रधानांची नक्कल केल्यामुळे विरोधकांनी विधानसभेत संताप व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान सहन केला जाणार नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
फडणवीस म्हणाले, भास्कर जाधव यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल करताना लाज वाटली पाहिजे. त्यामुळे भास्कर जाधाव यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी फडणवीसांनी केली आहे. तसेच यासाठी भास्करांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.