कोल्हापूरातील प्ले स्कूलमध्ये शिक्षिकेकडून चिमुकल्याला अमानुष मारहाण

देशातील अनेक शाळांमधून शिक्षकाने विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान कोल्हापूरमधील एका प्ले स्कूलच्या विद्यार्थ्याला शिक्षकाकडून मारहाणीची घटना उघडकीस आली आहे. कोल्हापूरमधील राजारामपुरी परिसरातील हॅपी बनिज या शाळेत हा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून यात शिक्षिका घसरगुंडी खाली लपलेल्या विद्यार्थ्याच्या केसाला आणि हाताला धरून बाहेर ओढत असताना दिसून […]

कोल्हापूरातील प्ले स्कूलमध्ये शिक्षिकेकडून चिमुकल्याला अमानुष मारहाण

देशातील अनेक शाळांमधून शिक्षकाने विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान कोल्हापूरमधील एका प्ले स्कूलच्या विद्यार्थ्याला शिक्षकाकडून मारहाणीची घटना उघडकीस आली आहे.

कोल्हापूरमधील राजारामपुरी परिसरातील हॅपी बनिज या शाळेत हा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून यात शिक्षिका घसरगुंडी खाली लपलेल्या विद्यार्थ्याच्या केसाला आणि हाताला धरून बाहेर ओढत असताना दिसून येत आहे.

शिक्षकेच्या अशा अमानुष मारहाणीला घाबरून हा विद्यार्थी गेल्या पाच दिवसांपासून शाळेला जाण्यास घाबरत होता. त्यामुळे पालकांनी मुलाची चौकशी केली असता हा प्रकार समोर आला आहे.

याबाबतीत विद्यार्थ्याच्या पालकांनी शिक्षके विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तसेच शिक्षण उपसंचालकाना सुद्धा निवेदन देऊन कारवाईची मागणी केली पालकांनी केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number