बिपीन रावत भारताचे पहिले CDS

देशाचे लष्करप्रमुख बिपिन रावत (Bipin Rawat) हे भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (Chief of Defense Staff) म्हणून उद्यापासून सूत्रं हाती घेत आहेत. सीडीएसचे पद हे तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांपेक्षावरील असणार आहे. जनरल बिपीन रावत हे 31 डिसेंबर रोजी लष्करप्रमुखांच्या पदावरून निवृत्त होत असून ते 1 जानेवारी 2020 रोजी नव्या पदाचा भार स्वीकारणार आहेत. संरक्षण […]

बिपीन रावत भारताचे पहिले CDS

देशाचे लष्करप्रमुख बिपिन रावत (Bipin Rawat) हे भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (Chief of Defense Staff) म्हणून उद्यापासून सूत्रं हाती घेत आहेत. सीडीएसचे पद हे तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांपेक्षावरील असणार आहे. जनरल बिपीन रावत हे 31 डिसेंबर रोजी लष्करप्रमुखांच्या पदावरून निवृत्त होत असून ते 1 जानेवारी 2020 रोजी नव्या पदाचा भार स्वीकारणार आहेत.

संरक्षण मंत्रालयानं (Defense) लष्करी सेवा आणि नियम कायद्यात सुधारणा केल्या आहेत. संरक्षण मंत्रालयानं 28 डिसेंबर रोजी काढलेल्या अधिसूचनेत सीडीएस (CDS) प्रमुख 65 वर्षांपर्यंत सेवेत राहू शकतात असं नमूद केलंय. केंद्र सरकारला आवश्यकता वाटल्यास सीडीएस प्रमुखांना मुदतवाढ देण्यात येऊ शकते. केंद्रीय सुरक्षा समितीनं नुकतीच सीडीएस पदाला मंजुरी दिलीय.

संबंधित बातमी- नरवणे यांच्या रूपाने मराठी माणूस लष्कराच्या सर्वोच्चपदी विराजमान

कोण आहेत बिपीन रावत?

रावत यांचे शालेय शिक्षण डेहराडून, शिमला येथे आणि भारतीय सैन्य अकादमीत झाले.रावत यांनी डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज वेलिंग्टन येथून पदवी घेतली.

त्यानंतर मद्रास विद्यापीठातून डिफेन्स स्टडीज मध्ये M. Phil केलं, तर त्यांना मेरठच्या विद्यापीठानं PhD देवून सन्मानित केलंय.

1978 साली त्यांनी 11 गोरखा रायफल्समधून आपल्या सैन्य दलातील कारकिर्दीला सुरूवात केली.

त्यानंतर त्यांनी उपसेना प्रमुख, संय़ुक्त राष्ट शांतता मिशन, कांगो लोकतांत्रिक गणराज्य, 19 इंन्फंट्री डिव्हीजन अशा विविध पदांवर काम केले.

परम विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेवा पदक, एड-डी-कॅम्प या पदकांनी गौरवण्यात आलंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number