विशाखापट्टणम : विडिंज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसरा वनडे सामना आज खेळण्यात येणार आहे. ही मॅच विशाखापट्ट्णम येथे खेळली जाणार आहे.
विंडिजने टीम इंडियाचा पहिल्या सामन्यात 8 विकेटने पराभव केला होता. त्यामुळे 3 वनडे सामन्याच्या मालिकेत पाहुण्या विंडिंजने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे टीम इंडियाला सीरिजमधील आव्हान कायम ठेवण्यासाठी आजचा सामना जिंकावा लागणार आहे.
टीम इंडियासाठी आज करो मरोची परिस्थिती आहे. टीम इंडियाने गेल्या 15 वर्षात मायदेशात एकही द्विपक्षीय सीरिज गमावलेली नाही. त्यामुळे टीम इंडियासाठी आज प्रतिष्ठा राखण्याचे आव्हान असणार आहे.
तर दुसऱ्या ठिकाणी मात्र विंडिज आजचा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याच्या प्रयत्नात असणार आहे. पहिल्या सामन्यात विंडिजच्या बॅट्समननी टीम इंडियाच्या बॉलिंगची पिसे काढली होती.
आपल्या बॉलर्सना विकेट काढण्यात अपयश आले होते. त्यामुऴे आज विंडिजच्या बॅट्समनना स्वसत्यात बाद करण्याचे आव्हान बॉलर्ससमोर असणार आहे.
टीम इंडियाच्या काही बॅट्समननी पहिल्या वनडेत निराशाजनक कामगिरी केली होती. त्यामुळे त्या बॅट्समनच्या कामगिरीकडे देखील आज लक्ष असणार आहे.
टीम इंडियाने दुसऱ्या वनडे सामन्यासाठी नेटमध्ये कसून सराव केला. त्यामुळे टीम इंडियाकडून आज धमाकेदार कामगिरीची अपेक्षा टीम इंडियाच्या समर्थकांना असणार आहे.