राज्यात कोरोनाच्या संख्येत दिवसेंदवस वाढ होताना दिसत आहे. गेली तीन दिवस राज्यात नव्याने आढणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या देखील पाचशेपार आहे. रविवारी राज्यात ५५० नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर गेल्या २४ तासामध्ये एकूण ३२४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सोमवारी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील मृत्यूदर हा १.८७ टक्के इतका आहे. तर राज्यात आतापर्यंत ७७,३५,००८ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.09 टक्के इतके झाले आहे. राज्यात आज एकूण २९९७ इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे २०७० रुग्ण हे मुंबईमध्ये आढळतात. तर त्या खालोखाल पुण्यामध्ये ३५४ इतके सक्रिय रुग्ण आहेत.
बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी मुंबईत एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. तर गेल्या २४ तासात मुंबईमध्ये २३४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईमध्ये सध्या २०७० सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत १०,४३,३४२ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण हे ९८ टक्के इतकं आहे. तसेच मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी २८७२ झाला आहे. तसेच कोरोना वाढीचा दर ०.०२४% टक्के इतका आहे.