नवाब मलिकांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मलिकांच्या न्यायालयीन कोठडीत ४ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ईडी न्यायालयाकडून मलिकांच्या कोठडीत ४ एप्रिलपर्यंत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे नवाब मलिकांना तुरुंगात बेड, अंथरूण आणि खुर्ची देण्यास न्यायालयाकडून परवानगी देण्यात आली आहे. तसेच नवाब मलिकांना मधुमेह असल्यामुळे कमी […]

नवाब मलिकांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मलिकांच्या न्यायालयीन कोठडीत ४ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

ईडी न्यायालयाकडून मलिकांच्या कोठडीत ४ एप्रिलपर्यंत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे नवाब मलिकांना तुरुंगात बेड, अंथरूण आणि खुर्ची देण्यास न्यायालयाकडून परवानगी देण्यात आली आहे. तसेच नवाब मलिकांना मधुमेह असल्यामुळे कमी मिठाचे घरचे जेवण देण्याची विनंती मान्य करण्यात आली असून वैद्यकीय अहवाल आल्यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे.

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने २३ फेब्रुवारी रोजी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री यांना अटक केली. दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच केंद्रीय तपास यंत्रणाची कारवाई कायद्यानुसार असून उच्च न्यायालयाने नवाब मलिकांची याचिका फेटाळली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number