कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य

दुर्गंधीमुळे कांजूर मार्ग येथील डंपिंग ग्राऊंड बंद करण्याची मागणी विक्रोळी आणि कांजूरमार्ग परिसरातून सातत्याने होत आहे.

कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य

मुंबई : दुर्गंधीमुळे कांजूर मार्ग येथील डंपिंग ग्राऊंड बंद करण्याची मागणी विक्रोळी आणि कांजूरमार्ग परिसरातून सातत्याने होत आहे. डम्पिंग ग्राऊंड बंद व्हावे यासाठी विक्रोळी विकास मंचाने न्यायालयात न्यायालयात धाव घेतील आहे. मात्र, नव्या डम्पिंग ग्राऊंडसाठी जागेचा पर्याय मिळत नाही तोपर्यंत हे डम्पिंग ग्राऊंड बंद करणे तूर्तास अशक्य असल्याचे महापालिकेच्या वरिष्ठ आधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले. या डम्पिंग ग्राऊंडचा करार २०२७ मध्ये संपत आहे. त्यामुळे हा करार संपण्यापूर्वी नव्या जागेचा शोध सुरू आहे.

 

काय आहे प्रकरण?

कांजूर डम्पिंग ग्राऊंडविषयी स्थानिक पातळीवर प्रचंड असंतोष आहे. डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याची स्थानिकांची मागणी कायम असून डम्पिंग ग्राऊंडबाबत स्थानिकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. निवडणुकीत सर्वपक्षीय उमेदवारांनी डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याचे आश्वासन दिले होते. डम्पिंग ग्राऊंडच्या कराराची मुदत २०२७ सालापर्यंत केली आहे. त्यामुळे

त्याआधी ते बंद होण्याची शक्यता नाही. आता डम्पिंगर ग्राऊंडसाठी पर्यायी जागेचा शोध सुरू आहे. असे मुंबई महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तळोजा किंवा अंबरनाथ येथे पर्यायांची चाचपणी केली जात आहे. डम्पिंग ग्राऊंडसाठी तिथे जागेचा शोध सुरू आहे. मात्र तळोजा आणि अंबरनाथ येथील स्थानिकांचा देखील डम्पिंग ग्राऊंडला विरोध असल्याचे दिसत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number