‘मुंबई मेट्रो 7अ’च्या मार्गिकेचं काम वेगात सुरु, कशी असेल मेट्रो 7अ

मुंबईच्या गतिमान वाहतुकीला आणखी एक बळ मिळालं आहे. गुरुवारी मुंबई मेट्रो 7A मार्गावरील 1.6 किमी लांबीचा भूमिगत बोगदा यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे.

‘मुंबई मेट्रो 7अ’च्या मार्गिकेचं काम वेगात सुरु, कशी असेल मेट्रो 7अ

मुंबई: मुंबईच्या गतिमान वाहतुकीला आणखी एक बळ मिळालं आहे. गुरुवारी मुंबई मेट्रो 7A मार्गावरील 1.6 किमी लांबीचा भूमिगत बोगदा यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. ‘दिशा' नावाची टनेल बोरिंग मशीनच्या साहाय्याने हा बोगदा खणण्यात आला असून, हे काम पूर्ण झाल्याने आता मार्गावर ट्रॅक आणि ओव्हरहेड वायर लावण्याच्या कामाला वेग मिळणार आहे. हा प्रकल्प गुंदवली स्थानक ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या प्रगतीचा आढावा घेतला. त्यामुळे लवकरच मेट्रो 7A मार्गिका प्रवाशांसाठी खुली होण्याची शक्यता आहे. हे टनेल पूर्ण झाल्याने, मेट्रोचे जाळे आणखी व्यापक होऊन मुंबईतील वाहतुकीचा ताण हलका होणार आहे.

Metro 7A प्रकल्पाची एकूण लांबी 3.4 किमी आहे. यामध्ये 0.94 किमी भाग हा उन्नत (Elevated) असून, 2.503 किमी भाग हा भूमिगत (Underground) आहे. यामध्ये 2 स्थानके प्रस्तावित आहेत – एक उन्नत (एअरपोर्ट कॉलनी) आणि एक भूमिगत (CSMIA). यासोबतच 0.57 किमी व्हायाडक्ट, 0.309 किमी रॅम्प आणि 2.035 किमी लांबीचे ट्विन टनेल्स बांधण्यात आले आहेत, ज्याचा व्यास 6.35 मीटर आहे. हे टनेल ड्युअल मोड हार्ड रॉक टीबीएमच्या मदतीने तयार करण्यात आले आहे, जे मुंबईच्या कठीण भूगर्भ रचनेतूनही सहजतेने मार्ग काढतात. 

या प्रकल्पाचे 5 प्रमुख फायदे 
1. मेट्रो 7A मार्ग पूर्ण झाल्यानंतर, मुंबईतील विविध मेट्रो मार्ग थेट आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडले जातील, ज्यामुळे वेळेची मोठी बचत होईल.
2. मेट्रो लाईन 3 (कुलाबा-बांद्रा-सीप्झ) आणि मेट्रो 7A यांच्यात सुलभ जुळवणी होईल, जे प्रवाशांसाठी अधिक सोयीस्कर ठरेल.
3. प्रवाशांना अधिक सुरक्षित, जलद आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल.
4. या प्रकल्पामुळे विविध वाहतूक साधनांमध्ये चांगले समन्वय साधला जाईल, ज्यामुळे प्रवास अधिक सुलभ होईल.
5. विमानतळ परिसरातील जागेचा जास्त वापर न करता भूमिगत आणि उन्नत मार्गिका तयार केल्यामुळे नागरी सुविधांवर परिणाम होणार नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number