मुंबई,२८ एप्रिल २०२३,प्रतिनिधी :काही लोकांना नाकात बोट घालायची इतकी सवय असते की ते लोकांसमोरही हे कृत्य करण्याची चूक करतात. यामुळे अनेकवेळा लाज वाटते, पण तरीही लोकांची ही सवय काही सुटत नाही. काही जण एकटे असताना नाकात बोटं घालतात तर काही जण सर्वांसमोर हे करतात. पण या वाईट सवयीचा आपल्या मेंदूच्या आरोग्यावरही परिणाम होतो, हे तुम्हाला माहीत आहे का ? एका संशोधनातून अशी माहिती समोर आली आहे की, नाकात बोट घालण्याच्या सवयीमुळे अल्झायमरचा गंभीर आजार होऊ शकतो.
१. नाकामध्ये बोट घातल्याने नाकाच्या आतील भागात जखम होऊ शकते. तसेच अनेकदा नाकाच्या आतील भागातील केस तुटतात. ज्यामुळे नाकाच्या आतील भागात सुज येते
२. नाकामध्ये सतत बोट घातल्याने रक्त वाहिन्यांना नुकसान पोहोचू शकते. ज्यामुळे कधी कधी त्यातून रक्त येते. तसेच आपली त्वचा देखील नाजूक होते.
३. बोटं फिरवल्याने तुमच्या नाकफुड्यानची पाकळी खराब होऊ शकते आणि नाकातला बॅक्टेरिया मेंदूपर्यंत पोहोचू शकतो. ज्यामुळे तुम्हाला कमी ऐकू येणे आणि समोरच्याच बोलणं न समजणे अशा प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. अशा प्रकारच्या आजाराला अल्जायमर सुद्धा म्हटले जाते. या सवयीमुळे तुम्हाला निमोनिया होऊ शकतो.