‘अध्यक्ष निवडणूक कार्यक्रम फुटला कसा?’ – सुधीर मुनगंटीवार

आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. आणि आजही सत्ताधारी आणि विरोधक आमन-सामने आले आहेत. आज विधानसभेच्या अध्यपदाच्या निवडणुकीची तारीख झाली. यावरून विरोधकांनी सवाल उपस्थित केला आहे. विधानसभेच्या अध्यक्ष निवडणूक कार्यक्रम फुटला कसा? असा सवाल भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला आहे. ‘सभागृहात अध्यक्ष निवडणूक कार्यक्रम घोषित का केला नाही?’ असा सवाल उपस्थित करत विधानसभा अध्यक्षांच्या […]

‘अध्यक्ष निवडणूक कार्यक्रम फुटला कसा?’ – सुधीर मुनगंटीवार

आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. आणि आजही सत्ताधारी आणि विरोधक आमन-सामने आले आहेत. आज विधानसभेच्या अध्यपदाच्या निवडणुकीची तारीख झाली. यावरून विरोधकांनी सवाल उपस्थित केला आहे. विधानसभेच्या अध्यक्ष निवडणूक कार्यक्रम फुटला कसा? असा सवाल भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला आहे.

‘सभागृहात अध्यक्ष निवडणूक कार्यक्रम घोषित का केला नाही?’ असा सवाल उपस्थित करत विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीच्या कार्यक्रमावरुन भाजप नेते सुधीर मुनंगटीवार यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर हक्कभंग आणणार असल्याचे म्हटले आहे. तर, अनिल परब यांनी सुधीर मुनगंटीवार पत्रकारांच्या माहितीवर सभागृहात येऊन वक्तव्य करत आहेत हे योग्य नसल्याचे म्हटले आहे. कार्यक्रम ज्यावेळी अध्यक्ष जाहीर करतील त्यावेळीच तो अधिकृत असेल, असे म्हटले आहे.

राज्यातील विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक येत्या २७ आणि २८ डिसेंबर रोजी होणार आहे. २७ डिसेंबर रोजी निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यात येईल तर २८ डिसेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. मात्र १२ आमदार निलंबित असताना विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक कशी? असा सवाल भाजपने उपस्थित केला.

१२ आमदार निलंबित असताना निवडणूक कशी? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला. त्यामुळे विरोधकांनी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी केली. मात्र राज्य सरकारने अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची विरोधकांची मागणी फेटाळली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number