प्रभाकर साईलच्या मृत्यूच्या चौकशीचे गृहमंत्र्यांचे आदेश

आर्यन खान कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणातील अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे पंच प्रभाकर साईल यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, प्रभाकर साईल यांच्या मृत्यू नंतर शनिवारी सकाळपासून त्यांच्या मृत्यूवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर प्रभाकर साईल यांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, प्रभाकर साईल […]

प्रभाकर साईलच्या मृत्यूच्या चौकशीचे गृहमंत्र्यांचे आदेश

आर्यन खान कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणातील अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे पंच प्रभाकर साईल यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, प्रभाकर साईल यांच्या मृत्यू नंतर शनिवारी सकाळपासून त्यांच्या मृत्यूवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर प्रभाकर साईल यांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले आहेत.

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, प्रभाकर साईल यांच्या मृत्यूमुळे संशयास्पद परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या मृत्यूच्या प्रकरणाची चौकशी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच येत्या काही दिवसांत प्रभाकर साईल यांच्या मृत्यू प्रकरणी चौकशी अहवाल येण्याची शक्यता आहे.

साईल मृत्यूप्रकरणी चौकशी करावी; राष्ट्रवादीची मागणी

प्रभाकर साईल यांचा हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती साईल यांचे वकील तुषार खंदारे यांनी दिली आहे. मात्र, प्रभाकर साईला यांचा मृत्यू झाला आहे की घातपात? असा सवाल राष्ट्रवादी युवक काँग्रेसने उपस्थित केला आहे. प्रभाकर साईल यांच्या मृत्यूमागे घातपाताची शक्यता असून राज्यसरकारने या प्रकरणी सीआयडी चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number