मुंबईत संततधार, जनजीवन विस्कळीत

मागील दोन दिवसापासून मुंबईत संततधार पाऊस पडत आहे. यामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचलं असून काही रस्ते जलमय झाले आहेत. 

मुंबईत संततधार, जनजीवन विस्कळीत

१४ जुलै, २०२४ मुंबई : मागील दोन दिवसापासून मुंबईत संततधार पाऊस पडत आहे. यामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचलं असून काही रस्ते जलमय झाले आहेत. 
राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस बारसत आहे. त्यामुळे नद्या, नाले दुथडी भरुन वाहताना दिसत आहेत. संततधार पावसामुळे सखल भागात पाणी साचून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईतही पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसत आहेत. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह उपनगरात काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस तर काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपनगरात रविवारी पहाटे पासूनच तासा-तासानं विश्रांती घेत पावसाची जोरदार फलंदाजी सुरू आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number