Homeताज्या बातम्याअयोध्या पुनर्विचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
अयोध्या पुनर्विचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
नवी दिल्ली : अयोध्येतील राम जन्मभूमी वादावरील पुनर्विचार याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात ही पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात आज दुपारी १.४० वाजल्यापासून चेंबरमध्ये याचिकांवरील सुनावणी होणार आहे. निर्मोही आखाड्याने ९ नोव्हेंबरला फेरविचार याचिका दाखल केली आहे. ही याचिका राम जन्मभूमीसंदर्भातील निर्णयावर नाही. तर शैबियत अधिकार, ताबा आणि मर्यादेबाबतच्या […]
नवी दिल्ली : अयोध्येतील राम जन्मभूमी वादावरील पुनर्विचार याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात ही पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात आज दुपारी १.४० वाजल्यापासून चेंबरमध्ये याचिकांवरील सुनावणी होणार आहे.
निर्मोही आखाड्याने ९ नोव्हेंबरला फेरविचार याचिका दाखल केली आहे. ही याचिका राम जन्मभूमीसंदर्भातील निर्णयावर नाही. तर शैबियत अधिकार, ताबा आणि मर्यादेबाबतच्या निर्णयावर या याचिकेद्वारे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.