आझाद मैदानात संपकरी कर्मचाऱ्यांचा जल्लोष

राज्यात सुरू असेलला एसटी कर्मचाऱ्यांचा तिढा आज सुटला आहे. आज एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मुंबई उच्च न्यायलयात सुनावणी पार पडली असून कर्मचाऱ्यांनी २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कर्मचाऱ्यांवर कारवाई नको, असे आदेशही राज्य सरकारला दिले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन, ग्रॅच्युएटी देण्याचे आदेश एसटी महामंडळाला देण्यात आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांमुळे […]

आझाद मैदानात संपकरी कर्मचाऱ्यांचा जल्लोष

राज्यात सुरू असेलला एसटी कर्मचाऱ्यांचा तिढा आज सुटला आहे. आज एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मुंबई उच्च न्यायलयात सुनावणी पार पडली असून कर्मचाऱ्यांनी २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कर्मचाऱ्यांवर कारवाई नको, असे आदेशही राज्य सरकारला दिले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन, ग्रॅच्युएटी देण्याचे आदेश एसटी महामंडळाला देण्यात आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांमुळे आझाद मैदानात संपकारी कर्मचाऱ्यांमध्ये जल्लोष पाहायला मिळाला.

एसटी संपाबाबत न्यायालयाने निर्णय दिला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर आझाद मैदानात कर्मचाऱ्यांमध्ये जल्लोष पाहायला मिळत आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे एसटी कर्मचारी भावूक झाले असून संपाबाबत निर्णय ऐकून कर्मचाऱ्यांना आनंदाश्रू अनावरण झाले.

मुंबई उच्च न्यायालायाने एसटी संपाबाबत दिलेल्या निर्णयानंतर एसटी कर्मचाऱ्यांचे वकील ऍड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले, संप घेण्याचे आवाहन करूनही संपकारी कर्मचाऱ्यांवर आता कोणतीही कारवाई न करता कामावर रुजू करून घेण्यात येणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन आणि ग्रॅच्युएटी देण्याचे आदेशही उच्च न्यायालयाने दिले आहेत, असे ते म्हणाले.

‘२२ एप्रिलपर्यंत सेवेत रुजू व्हा’

मागील पाच महिन्यांपासून राज्यात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर आज सुनावणी झाली. मुंबई उच्च न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्यास सांगितले आहे. तसेच कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन, ग्रॅच्युएटीचा लाभ देण्याबाबत आदेश देण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. संपकारी कर्मचारी सेवेत रुजू होताना कर्मचाऱ्यांनी पुन्हा असे होणार नाही, अशी समज देत सेवेत रुजू करण्याचे आदेशही उच्च न्यायालयाने एसटी महामंडळाला दिले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number