‘माझ्या घरी पाहुणे येणार आहेत’, नवाब मलिकांचे ट्विट

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी रविवारी रात्री नवे ट्विट करत आपल्या घरी ईडीची धाड पडणार असल्याची चाहुल लागली असल्याचे सांगितले. त्यांनी ट्विट केले की, ‘पहाटे माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार आहेत. घरी येणाऱ्या पाहुण्यांचे चहा आणि खाद्यपदार्थ देऊन स्वागत करणार असल्याचे’, मलिकांनी ट्विट करून सांगितले. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी […]

‘माझ्या घरी पाहुणे येणार आहेत’, नवाब मलिकांचे ट्विट

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी रविवारी रात्री नवे ट्विट करत आपल्या घरी ईडीची धाड पडणार असल्याची चाहुल लागली असल्याचे सांगितले. त्यांनी ट्विट केले की, ‘पहाटे माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार आहेत. घरी येणाऱ्या पाहुण्यांचे चहा आणि खाद्यपदार्थ देऊन स्वागत करणार असल्याचे’, मलिकांनी ट्विट करून सांगितले.

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट केले की, ‘उद्या पहाटे माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार असल्याची माहिती त्यांनी ट्विट करत दिली. तसेच त्यांच्या स्वागतासाठी मी तयारी करणार असून पाहुण्यांसाठी चहा आणि बिस्किटही तयार असणार आहेत. तसेच माझ्या घरचा पत्ता शोधण्यासाठी मला फोन करावा’, असे नवाब मलिकांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

क्रुझवरील ड्रग्जप्रकरणी नवाब मलिकांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. तसेच दरम्यान त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही आरोप केले आहेत. समीर वानखेडे यांच्याविरोधात मलिकांनी सतत ट्विट करत आरोपपत्र सुरूच ठेवले. एनसबीच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे आपल्या घरी लवकरच ईडीची धाड पडणार असल्याचे मलिकांनी ट्विट करत म्हटले होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number