धक्कादायक! आजीनेच नातीला सहाव्या मजल्यावरुन फेकले

आजीने आपल्या दोन वर्षाच्या नातीला सहाव्या मजल्यावरुन फेकल्याची धक्कादायक घटना मालाडच्या आप्पापाडा परिसरात घडली आहे. या घटनेत जिया हीचा मृत्यू झाला आहे. आजी रुकसाना अन्सारी (50) यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी रुकसाना यांची चौकशी केल्यानंतर असे समोर आले, रुकसाना ही जियाची सावत्र आजी असून जिया तिच्या दुसऱ्या नातावसोबत सतत भांडत असल्याने तसेच तिलाही त्रास […]

धक्कादायक! आजीनेच  नातीला सहाव्या मजल्यावरुन फेकले

आजीने आपल्या दोन वर्षाच्या नातीला सहाव्या मजल्यावरुन फेकल्याची धक्कादायक घटना मालाडच्या आप्पापाडा परिसरात घडली आहे. या घटनेत जिया हीचा मृत्यू झाला आहे. आजी रुकसाना अन्सारी (50) यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी रुकसाना यांची चौकशी केल्यानंतर असे समोर आले, रुकसाना ही जियाची सावत्र आजी असून जिया तिच्या दुसऱ्या नातावसोबत सतत भांडत असल्याने तसेच तिलाही त्रास देत असल्याने जियाला मारल्याचे पोलिसांच्या चौकशीतून स्पष्ट झाले आहे.

नेमकं काय घडलं

वांद्रे येथे राहत असलेले इजाज अन्सारी यांचे कुटुंब काही दिवसापूंर्वीच कुरार येथे राहण्यास आले होते.

शनिवारी पहाटे जिया इमारतीखाली पडलेली नागरिकांना दिसली , त्याच क्षणी तिला उपचारासाठी त्वरित शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले.

परंतू डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. आणि उंचावरुन पडल्याने तिचा मृत्यू झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.

त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला. खेळण्यावरुन दोन्ही नातंवडांमध्ये भांडणे होत असून प्रत्येक वेळी रुकसाना ह्या नातवाची बाजू घेत आणि जियाला मारहाण करत होत्या.

याबाबतील रुकसाना यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी जिया हिची हत्या केल्याचे कबुली दिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number