गोविंदांना सरकारचे विमाकवच

मुंबई, १९ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : राज्यात दहीहंडी उत्सव आणि प्रो गोविंदा लीगदरम्यान तब्बल ५० हजार गोविंदांना विमाकवच देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने शुक्रवारी शासन निर्णयाच्या माध्यमातून जाहीर केला. या निर्णयानुसार गोविंदाचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना १० लाख रुपये देण्यात येतील. तसेच, कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास १० लाख रुपयांचा विमा उतरविण्यात आला आहे. यासाठी ओरिएन्टल […]

गोविंदांना सरकारचे विमाकवच

मुंबई, १९ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : राज्यात दहीहंडी उत्सव आणि प्रो गोविंदा लीगदरम्यान तब्बल ५० हजार गोविंदांना विमाकवच देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने शुक्रवारी शासन निर्णयाच्या माध्यमातून जाहीर केला. या निर्णयानुसार गोविंदाचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना १० लाख रुपये देण्यात येतील. तसेच, कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास १० लाख रुपयांचा विमा उतरविण्यात आला आहे.

यासाठी ओरिएन्टल इन्शुरन्स विमा कंपनीची निवड करण्यात आली असून त्यासाठी ३७ लाख ५० हजार रुपयांचा निधी दहीहंडी समन्वय समितीला वितरित करण्याचा निर्णय यावेळी जाहीर करण्यात आला आहे. ५० हजार गोविंदांना ७५ रुपये विमाहफ्ता याप्रमाणे याप्रमाणे ३७ लाख ५० हजार रुपयांचा निधी विमा कंपनीस अदा करण्यासाठी दहीहंडी समन्वय समिती या संस्थेस वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

अपघाती मृत्यू झाल्यास १० लाख, दोन अवयव किंवा दोन डोळे गमावल्यास १० लाख, एक हाथ एक पाय किंवा एक डोळा गमावल्यास ५ लाख, तर कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास १० लाख अशी मदत करण्यात येईल.

५० हजार गोविंदांचा विमा उतरविण्याचा सरकारच्या निर्णयाचे दहीहंडी समन्वय समितीने स्वागत केले आहे. येत्या काही महिन्यात प्रो गोविंदा लीग सुरु होणार आहे. तेव्हापासूनच हा विमा लागू करण्यात येईल. त्यामुळे सर्व दहीहंडी मंडळांनी तातडीने दहीहंडी समन्वय समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन समितीचे प्रमुख बाळा पडेलकर यांनी केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number