Goregaon Mulund Link Road : आनंदाची बातमी! गोरेगाव-मुलुंड प्रवास आता 10 ते 15 मिनिटांत; भुयारीमार्ग प्रकल्पाचा लवकरच होणार श्रीगणेशा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पाला वेग आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जुळ्या बोगद्याच्या खोदकामासाठी लागणारे आधुनिक टनेल बोअरिंग मशीन मुंबईत दाखल झाले आहे.

Goregaon Mulund Link Road : आनंदाची बातमी! गोरेगाव-मुलुंड प्रवास आता 10 ते 15 मिनिटांत; भुयारीमार्ग प्रकल्पाचा लवकरच होणार श्रीगणेशा

मुंबई: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पाला वेग आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जुळ्या बोगद्याच्या खोदकामासाठी लागणारे आधुनिक टनेल बोअरिंग मशीन मुंबईत दाखल झाले आहे. लवकरच, गोरेगाव-मुलुंड लिंक रोड भुयारीमार्गाला श्रीगणेशा होणार आहे. या महत्त्वकांक्षी प्रकल्पासाठी, जे. कुमार-एनसीसी कन्सोर्टियम यांच्याकडे कंत्राट सुपुर्द करण्यात आले असून लिंक रोडचे काम मुंबई महापालिकेने हाती घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जपानमधून भुयार खोदणाऱ्या मशीनचे सर्व कंटेनर जपानमधून आयात करण्यात आले आहे. तसेच, डिसेंबर 2025 पर्यंत दुसऱ्या टनेल बोरिंग मशीनचे भाग मुंबईत दाखल होतील. या प्रकल्पामुळे, प्रवाशांचा वेळ वाचणार असून हा प्रवास जलद आणि आरामदायी होणार आहे. तसेच, या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी समस्या कमी होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

हेही वाचा: Mumbai News : वाहतूक कोंडीवर नवा प्रयोग;MMRDAचा एआय सॉफ्टवेअर आणि ड्रोन सर्वेक्षण

गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्प गोरेगाव पूर्वे येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंडमधील खिंडीपाडा असे 4.70 किमी लांबीचे दोन भुयारी बोगदे बांधण्यात येणार आहेत. तसेच, या प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालील जुळ्या बोगद्याच्या बांधकामाला आता गती मिळणार आहे. या प्रकल्पासाठी, वन विभागाची 19.43 हेक्टर जमीन मुंबई महापालिकेला सुपूर्द करण्यात आली आहे. सोबतच, या प्रकल्पासाठी, केंद्रीय पर्यावरण, वन आणि वातावरणीय मंत्री मंत्रालय यांनीही मान्यता दिली आहे. 

सध्या, गोरेगाव ते मुलुंड किंवा जोगेश्वरी ते विक्रोळी किंवा ठाणे शहरात पोहोचण्यासाठी अंदाडे एक ते दीड तास लागतो. मात्र, जर हा नवीन बोगदा प्रवाशांसाठी खुला झाला, तर एक ते दीड तासांचा प्रवास फक्त 10 ते 15 मिनिटांत पूर्ण होईल. इतकंच नाही, तर प्रवाशांचा वेळ आणि इंधनाचीदेखील बचत होईल. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number