गुगलने नवीन नेस्ट हब लाँच केले असून ते ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. हे ग्राहकांना 9999 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. ग्राहक या डिव्हाईसला फ्लिपकार्ट, टाटा क्लिक, क्रोम आणि रिलायंस डिजीटलने खरेदी करू शकणार आहेत.
गुगलच्या या नवीन नेस्ट हब मध्ये बिल्ट इन स्पीकर आणि टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच या नेस्ट हबमध्ये 7-इंचेचा डिस्प्ले असणार आहे.
डिव्हाईसमध्ये बिल्ट इन वूफर स्टीरियो स्पीकर्स सोबतचं 6.5 मेगापिक्सलचा कॅमेरा देखील असणार आहे.
प्री-इन्स्टॉल ऐप्स जसे यूट्यूब, गूगल फोटोज, प्ले म्युझिक या सगळ्या गोष्टी देखील या नेस्ट हबमध्ये मिळणार आहेत.
यामध्ये ग्राहकास युट्यूबचे व्हिडिओ देखील पहायला मिळणार आहेत. मोबाईल प्रमाणे त्यांत अलार्म देखील लावता येणार आहे.
ग्राहक या डिव्हाईसला फ्लिपकार्ट, टाटा क्लिक, क्रोम आणि रिलायंस डिजीटलने खरेदी करू शकणार आहेत.