तक्रारदार महिलेशी नातं असल्याची गणेश नाईकांची कबुली

भाजप आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य महिला आयोगाच्या निर्देशनानंतर नाईकांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यासाठी नाईकांनी अटकपूर्व जामीनासाठी ठाणे सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला मात्र, न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. दरम्यान, तक्रारदार महिलेशी नातं असल्याची कबुली गणेश नाईक यांनी दिली आहे. भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर दीपा […]

तक्रारदार महिलेशी नातं असल्याची गणेश नाईकांची कबुली

भाजप आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य महिला आयोगाच्या निर्देशनानंतर नाईकांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यासाठी नाईकांनी अटकपूर्व जामीनासाठी ठाणे सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला मात्र, न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. दरम्यान, तक्रारदार महिलेशी नातं असल्याची कबुली गणेश नाईक यांनी दिली आहे.

भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर दीपा चौहान या महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी गणेश नाईक यांनी कबुली दिली आहे. तक्रारदार महिला दीपा चव्हाण यांच्याशी नातं असल्याची कबुली गणेश नाईक यांनी दिली आहे.

दरम्यान, याप्रकरणी गणेश नाईक यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली. नाईकांनी वकिलांमार्फत ठाणे सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला. याप्रकरणी सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली असून न्यायालयाने त्यांना दिलासा दिलेला नाही. न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला असून नाईकांवर अटकेची तांगती तलवार कायम आहे. तसेच नाईकांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर पुढील सुनावणी २७ एप्रिल रोजी होणार आहे.

काय आहे प्रकरण?

भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर २७ वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा दावा करणाऱ्या महिलेने हा गुन्हा दाखल केला आहे. नाईक यांच्यासोबत २७ वर्ष लिव्ह इनमध्ये राहून त्यांच्याकडून मला एक मुलगा आहे, परंतु ते त्याचा स्वीकार करण्यास नकार देत असल्यामुळे संबंधित महिलेने त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे.

पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर नाईकांवर कारवाई न झाल्यामुळे पीडित महिलेने महाराष्ट्र महिला आयोगाकडे धाव घेतली. त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या निर्देशानंतर पोलिसांनी गणेश नाईक यांच्याविरोधात बलात्काराच गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number