पेट्रोल-डिझेलचे दर वाढतेच; मुंबई पेट्रोल शंभरीपार

देशात पाच राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर पेट्रोलच्या किंमती सातत्याने वाढत असल्याचं दिसून आलं आहे. अनेक राज्यांमध्ये पेट्रोलनं इतिहासात पहिल्यांदाच शंभरीपार मजल मारली आहे. त्यामुळे ऐन कोरोनाच्या संकटकाळात आर्थिक पेच निर्माण झालेला असताना सर्वसामान्यांना पेट्रोल दरवाढीचा भुर्दंड सोसावा लागत आहे. एकीकडे पेट्रोल दरवाढीवरून केंद्र सरकार आणि राज्य सरकारे कुणाचे कर जास्त? यावरून एकमेकांकडे टोलवाटोलवी करत असताना सर्वसामान्य […]

पेट्रोल-डिझेलचे दर वाढतेच; मुंबई पेट्रोल शंभरीपार

देशात पाच राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर पेट्रोलच्या किंमती सातत्याने वाढत असल्याचं दिसून आलं आहे. अनेक राज्यांमध्ये पेट्रोलनं इतिहासात पहिल्यांदाच शंभरीपार मजल मारली आहे. त्यामुळे ऐन कोरोनाच्या संकटकाळात आर्थिक पेच निर्माण झालेला असताना सर्वसामान्यांना पेट्रोल दरवाढीचा भुर्दंड सोसावा लागत आहे. एकीकडे पेट्रोल दरवाढीवरून केंद्र सरकार आणि राज्य सरकारे कुणाचे कर जास्त? यावरून एकमेकांकडे टोलवाटोलवी करत असताना सर्वसामान्य जनता मात्र हा अतिरिक्त आर्थिक भार सहन करत आहे. शनिवारी १० जुलै रोजी देखील वाढलेल्या पेट्रोलच्या किंमतींमुळे हा भार अजूनच वाढला आहे.

काय आहेत आजच्या किंमती?
दिल्लीमधील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती अनुक्रमे १००.९१ रुपये आणि ८९.८८ रुपये इतक्या झाल्या आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत देखील पेट्रोल शंभरीपार असून प्रतिलिटर १०६ रुपये ९३ पैसे तर डिझेल प्रतिलिटर ९७ रुपये ४६ पैसे इतकी किंमत झाली आहे. दुसरीकडे कोलकात्यामध्ये हेच दर अनुक्रमे १०१.०१ रुपये आणि ९२.९७ रुपये तर भोपाळमध्ये ते १०९.२४ रुपये आणि ९८.६७ रुपये इतके नोंदवण्यात आले आहेत.

शहरनिहाय पेट्रोल-डिझेलच्या किंमती

 

पेट्रोल                        डिझेल

दिल्ली – १००.९१ रुपये           ८९.९८ रुपये प्रतिलिटर
मुंबई – १०६.९२ रुपये            ९७.४६ रुपये प्रतिलिटर
चेन्नई – १०१.६७ रुपये            ९४.३९ रुपये प्रतिलिटर
कोलकाता – १०१.०१ रुपये     ९२.९७ रुपये प्रतिलिटर
बंगळुरू –  १०४.२९ रुपये      ९५.२६ रुपये प्रतिलिटर
लखनऊ –  ९८.०१ रुपये        ९०.२७ रुपये प्रतिलिटर
पटना – १०३.१८ रुपये            ९५.४६ रुपये प्रतिलिटर
भोपाळ – १०९.२४ रुपये        ९८.६७ रुपये प्रतिलिटर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number