चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक – महेश कोठारे यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच मुंबईत पार पडला, या कार्यक्रमात महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर यांच्यात तसं होतं की मैत्री होती, यावर महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर व्यक्त झाले आहेत.
महेश कोठारे यांच्या ‘डॅम इट आणि बरेच काही’ या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा बुधवार, दिनांक ११ जानेवारी २०२३ रोजी शिवाजी मंदिर नाट्यगृह (दादर) येथे पार पडला. या कार्यक्रमात महेश कोठारे आणि सचिन पिळगावकरांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. या दोघांतल्या टशनविषयी बोलताना ‘ आपल्याला आयुष्यात जर काही करायचं असेल आणि आपल्याला टशन देणारी व्यक्ती समोर असेल तर आपण आणखी चांगल्या रीतीने आपलं ध्येय गाठू शकतो’, असं पिळगावकर म्हणाले. ‘आमच्या जितकी स्पर्धा होती तितकीच आमच्या प्रेक्षकांमध्ये सुद्धा होती, आमच्यात टशन असलं तरीही एकमेकांविषयी आदर होता, एकमेकांच्या चित्रपटांच्या कार्यक्रमांना आम्ही हजर असायचो,’ असंही पिळगावकर यावेळी म्हणाले.
मराठी चित्रपटसृष्टीत नवीन पद्धत आणण्यासाठी महेश कोठारेंचं मोठं योगदान आहे, असंही पिळगावकर या वेळी म्हणाले.