जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचं निधन

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचं निधन झालं आहे. शिंजो आबे यांच्यावर भाषण करताना जीवघेणा गोळीबार करण्यात आला. गोळी लागल्यानंतर आबे यांना हृदयविकाराचा झटका. त्यामुळे त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान शिंजो आबे यांचं निधन झालं आहे. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर एका कार्यक्रमात भाषण करताना गोळीबार करण्यात आला. त्यामुळे त्यांना […]

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचं निधन

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचं निधन झालं आहे. शिंजो आबे यांच्यावर भाषण करताना जीवघेणा गोळीबार करण्यात आला. गोळी लागल्यानंतर आबे यांना हृदयविकाराचा झटका. त्यामुळे त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान शिंजो आबे यांचं निधन झालं आहे.

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर एका कार्यक्रमात भाषण करताना गोळीबार करण्यात आला. त्यामुळे त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मात्र, उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी मारेकऱ्यांचा शोध घेतला असून गोळीबार करणाऱ्या दोन हल्लेखोऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यासोबत चांगले संबंध होते. शिंजो आबे यांनी आजारपणामुळे त्यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला होता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number