जाणून घ्या… मुंबईतील मुलांची लसीकरण केंद्रे

आजपासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरूवात झाली आहे. मुलांच्या लसीकरण मोहिमेसाठी राज्यात ठिकठिकाणी लसीकरण केंद्र उभारण्यात आली असून मुंबईत ९ केंद्रांवर मुलांसाठी लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. मुलांच्या लसीकरणासाठी कोव्हॅक्सिन लसीचा वापर करण्यात येणार असून १५ ते १६ वर्ष असलेल्या शाळकरी मुलांना विनामूल्य लस देण्यात येणार आहे. मुंबईतील लसीकरण केंद्रे एन, ए, […]

जाणून घ्या… मुंबईतील मुलांची लसीकरण केंद्रे

आजपासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरूवात झाली आहे. मुलांच्या लसीकरण मोहिमेसाठी राज्यात ठिकठिकाणी लसीकरण केंद्र उभारण्यात आली असून मुंबईत ९ केंद्रांवर मुलांसाठी लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. मुलांच्या लसीकरणासाठी कोव्हॅक्सिन लसीचा वापर करण्यात येणार असून १५ ते १६ वर्ष असलेल्या शाळकरी मुलांना विनामूल्य लस देण्यात येणार आहे.

मुंबईतील लसीकरण केंद्रे

एन, ए, बी, सी, डी, ई या पाच प्रशासकीय विभागांसाठी भायखळामधील रिचर्डसन क्रूडास येथे लसीकरण केंद्र.

एन, एफ/उत्तर, एल, एम/पूर्व, एम/पश्चिम या चार विभागांसाठी सायनच्या सोमय्या मैदानावर जम्बो लसीकरण केंद्र.

एन, एफ/ दक्षिण, जी/ दक्षिण, जी/उत्तर या तीन विभागांसाठी वरळीतील एनएससीआय डोम जम्बो कोविड लसीकरण केंद्र.

एन, एच/पूर्व, के/पूर्व, एच/पश्चिम या तीन विभागांसाठी वांद्रे-कुर्ला संकुलातील बीकेसी जम्बो कोविड लसीकरण केंद्र.

एन, के/ पश्चिम, पी/ दक्षिण या दोन विभागांसाठी गोरेगाव (पूर्व)मधील नेस्को जम्बो कोविड लसीकरण केंद्र.

न, आर/ दक्षिण, पी/ उत्तर या दोन विभागांसाठी मालाड (पश्चिम) मधील मालाड जम्बो कोविड लसीकरण केंद्र.

एन, आर/ मध्य, आर/ उत्तर विभागांसाठी दहिसर जम्बो कोविड लसीकरण केंद्र.

एन, एस विभागांसाठी कांजूरमार्ग (पूर्व) मधील क्रॉम्प्टन ऍण्ड ग्रीव्हस् जम्बो कोविड लसीकरण केंद्र.

एन, टी विभागासाठी मुलूंड (पश्चिम) मधील रिचर्डसन क्रूडास मुलूंड जम्बो कोविड लसीकरण केंद्र.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number