अखेर दिपाला समजणार कार्तिकचं सत्य

मुंबई, 4 मे २०२३, प्रतिनिधी :छोट्या पडद्यावरील ‘रंग माझा वेगळा’ हि मालिका सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याचं कारण म्हणजे मालिकेचं बदललेलं कथानक. ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेने सतत १५ आठवडे टीआरपी यादीत प्रथम स्थानावर राहण्याचा रेकॉर्ड केला होता. ही मालिका प्रेक्षकांची अत्यंत आवडती आहे. मालिकेतील दीपा आणि कार्तिकच्या जोडीवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. प्रेक्षकांना […]

अखेर दिपाला समजणार कार्तिकचं सत्य

मुंबई, 4 मे २०२३, प्रतिनिधी :छोट्या पडद्यावरील ‘रंग माझा वेगळा’ हि मालिका सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याचं कारण म्हणजे मालिकेचं बदललेलं कथानक. ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेने सतत १५ आठवडे टीआरपी यादीत प्रथम स्थानावर राहण्याचा रेकॉर्ड केला होता. ही मालिका प्रेक्षकांची अत्यंत आवडती आहे. मालिकेतील दीपा आणि कार्तिकच्या जोडीवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. प्रेक्षकांना दीपा आणि कार्तिक यांचा सुखी संसार पाहायचा होता मात्र त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरलं आहे. आता प्रेक्षक या मालिकेला नावं ठेवताना दिसत आहेत. कारण कार्तिकला मालिकेत खलनायक बनवण्यात आले.

साक्षी च्या खुनाचा आरोप हा कार्तिक वर करण्यात आला होता. त्यानंतर कार्तिकला १४ वर्षे तुरंगवास भोगावा लागला त्यामुळे कार्तिकला दिपाचा राग येऊ लागला. तुरुंगातुन सुटल्यानांतर कार्तिक दिपवर प्रेम करत असल्याचं खोटं नाटक करून त्याचा बदला घेतोय हे मालिकेत पाहायला मिळतंय. तर आता मालिकेत रंजक वळण पाहायला मिळणार आहे. दिपा काही कारणास्तव पोलीस स्टेशनला जाते . दरम्यान कार्तिक तिच्यावर राग असून खोटं प्रेम करतोय हे समजणार आहे. तर आता दिपा काय करणार मालिकेत नवीन काय ट्विस्ट येणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.

या मालिकेचं कथानक फिरल्या मुळे अनेक प्रेक्षक नाराज झाले असून इतका वनवास फक्त दीपा लाच का? काही आनंद आहे का नाही तिच्या आयुष्यात,’ असा सवाल दुसऱ्या युजरने केला आहे. ‘सर्वांत नकारात्मक मालिका आहे ही, पण नकारात्मक प्रसिद्धीसुद्धा प्रसिद्धीच असते’, असंही नेटकऱ्यांनी लिहिलं आहे. आता तरी प्रेक्षकांचा वनवास संपवा, अशीही विनंती काहींनी केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number