लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्याकडेच लाच मागणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

  रायगडमधील अलिबाग येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात घुसून एका पोलीस हवालदाराकडेच ५० लाख रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार घडला आहे. लाच विभगातील अधिकाऱ्याकडेच लाच मागितल्यामुळे अलिबागमध्ये खळबळ उडाली आहे. आरोपी विरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   दुपारच्या सुमारास लाचलुचपत कार्यालयात घुसून अरुण बेलोसकर नामक व्यक्तीने जमिनीच्या व्यवहाराप्रकरणी एक कोटी रुपये घेतल्याचा […]

लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्याकडेच लाच मागणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

  रायगडमधील अलिबाग येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात घुसून एका पोलीस हवालदाराकडेच ५० लाख रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार घडला आहे. लाच विभगातील अधिकाऱ्याकडेच लाच मागितल्यामुळे अलिबागमध्ये खळबळ उडाली आहे. आरोपी विरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  दुपारच्या सुमारास लाचलुचपत कार्यालयात घुसून अरुण बेलोसकर नामक व्यक्तीने जमिनीच्या व्यवहाराप्रकरणी एक कोटी रुपये घेतल्याचा आरोप अधिकारी दीपक मोरे यांच्यावर केला. त्यामुळे त्यासंबंधी ५० लाख रुपये देण्याची मागणी त्या व्यक्तीने अधिकाऱ्याकडे केली. अधिकाऱ्याने पैसे देण्यास नकार दिल्यावर फिर्यादी अधिकाऱ्याला शिवीगाळ आणि मारण्याची धमकी दिली. ‘तुझी नोकरी घालवेल. तुझी नोकरी वाचवायची असेल तर मला पैसे दे’ अशा शब्दांत बेलोसकर याने दीपक मोरे यांना धमकावले. आणि तेथून निघून गेला. याप्रकरणी लाच मागणाऱ्या अरूण बेलोसकरविरुद्ध अलिबाग पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number