सरकारच्या ‘या’ निर्णयाचे शेतकऱ्यांकडून स्वागत

शेतकऱ्यांसाठी सरकारने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या कांदा प्रश्नावर सरकारने आता कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयाने कांद्याच्या भावात सुधारणा होणार असल्याने येवल्यातील शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. सरकारने निर्यातीचे शुल्क माफ करावे, अशी मागणी ही शेतकऱ्यांनी यावेळी केली आहे. केंद्र सरकारने कांदे निर्यात बंदी हटविण्याचा निर्णय घेतल्याने […]

सरकारच्या ‘या’ निर्णयाचे शेतकऱ्यांकडून स्वागत

शेतकऱ्यांसाठी सरकारने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या कांदा प्रश्नावर सरकारने आता कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

या निर्णयाने कांद्याच्या भावात सुधारणा होणार असल्याने येवल्यातील शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

सरकारने निर्यातीचे शुल्क माफ करावे, अशी मागणी ही शेतकऱ्यांनी यावेळी केली आहे. केंद्र सरकारने कांदे निर्यात बंदी हटविण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना व व्यापारी यांना मोठा फायदा होणार आहे.

निर्यात शुल्क माफ केल्याने शेतकऱ्यांना पुरेसे उत्पन्न मिळू शकेल, असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

सरकारच्या या निर्णयाचे राज्यातील शेतकऱ्यांनी स्वागत केले असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. सरकारचा या निर्णयामुळे काही प्रमाणात का होईना शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे यावरून स्पष्ट होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number