आंगणेवाडीच्या जत्रेसाठी रेल्वे प्रशासनाकडून जादा एक्सप्रेस

कोकणातील मालवण येथील प्रसिद्ध आंगणेवाडीची जत्रा 17 फेब्रुवारीला असून यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आंगणेवाडीच्या यात्रेसाठी मुंबई, पुणेमधून अनेक भक्त आंगणे गावात येतात. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले. आंगणे वाडी जत्रेसाठी विशेष तीन साप्ताहिक एक्सप्रेस सोडण्यात येणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस आणि पनवेलहून सावंतवाडी, थिवी आणि करमाळी […]

आंगणेवाडीच्या जत्रेसाठी रेल्वे प्रशासनाकडून जादा एक्सप्रेस

कोकणातील मालवण येथील प्रसिद्ध आंगणेवाडीची जत्रा 17 फेब्रुवारीला असून यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

आंगणेवाडीच्या यात्रेसाठी मुंबई, पुणेमधून अनेक भक्त आंगणे गावात येतात. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले.

आंगणे वाडी जत्रेसाठी विशेष तीन साप्ताहिक एक्सप्रेस सोडण्यात येणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस आणि पनवेलहून सावंतवाडी, थिवी आणि करमाळी साठी विशेष एक्सप्रेस सोडण्यात येणार आहेत.

हे आहे वेळापत्रक…

14 फेब्रुवारी एलटीटी ते सावंत वाडी विशेष एक्सप्रेस
वेळ – मध्यरात्री 1.10 मिनीटांनी
पोहचण्याची वेळ – त्याचदिवशी दुपारी 12.20 वाजता.
परतीचा प्रवास – 14 फेब्रुवारी-सावंतवाडी रोड
वेळ – दुपारी 1.30 वाजता
पोहचण्याची वेळ -15 फेब्रुवारी दुपारी 12.20

या स्थानकांवर थांबेल – ठाणे, पनवेल,रोहा,मडगाव,खेड,चिपळून,रत्नागिरी,राजापूर रोड,वैभववाडी रोड,कणकवली,सिंधुदूर्ग आणि कुडाळ या स्थानकांवर थांबेल.

17 फेब्रुवारी एलटीटी ते सावंतवाडी विशेष एक्सप्रेस
वेळ – मध्यरात्री 1.10मिनीटांनी पोहचण्याची वेळ – त्याचदिवशी दुपारी 12.20 वाजता.
परतीचा प्रवास – 17 फेब्रुवारी-सावंतवाडी रोड
वेळ – संध्याकाळी 5:00 वाजता
पोहचण्याची वेळ – 18 फेब्रुवारी रात्री 3.25 वाजता

या स्थानकांवर थांबेल – ठाणे,पनवेल,रोहा,मडगाव, खेड,चिपळून, रत्नागिरी,राजापूर रोड,वैभववाडी रोड,कणकवली रोड,सिंधुदूर्ग आणि कुडाळ या स्थानंकावर थांबेल.

14 फेब्रुवारीएलटीटी ते थिवी विषेश एक्सप्रेस
वेळ – रात्री 8.45 वाजता
पोहचण्याची वेळ – 15 फेब्रुवारी सकाळी 7.20 वाजता सावंतवाडी येथे पोहचेल.
परतीचा प्रवास – 16 फेब्रुवारी – सकाळी 11.55 वाजता -थिवीहून सुटेल
पोहचण्याची वेळ- 16 फेब्रुवारी -मध्यरात्री 12.20 वाजता

या स्थानकांवर थांबेल – ठाणे,पनवेल,रोहा,मडगाव, खेड,चिपळून,संगमेश्वर रोड, रत्नागिरी,राजापूर रोड,वैभववाडी रोड,कणकवली रोड,सिंधुदूर्ग ,कुडाळ आणि सावंतवाडी या स्थानंकावर थांबेल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number