सलमान खानची भावुक पोस्ट

मुंबई, 4 मे २०२३, प्रतिनिधी :बॉलीवूड दबंग अभिनेता सलमान खान हा अनेक कारणांमुळे चर्चेत येत असतो.सलमान खानचा किसी का भाई किसी कि जान हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. मात्र या चित्रपटाला फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नसला तरी सलमान खान त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशन साठी व्यस्थ आहे. दरम्यान त्याला गेल्या काही दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमक्या येत […]

सलमान खानची भावुक पोस्ट

मुंबई, 4 मे २०२३, प्रतिनिधी :बॉलीवूड दबंग अभिनेता सलमान खान हा अनेक कारणांमुळे चर्चेत येत असतो.सलमान खानचा किसी का भाई किसी कि जान हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. मात्र या चित्रपटाला फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नसला तरी सलमान खान त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशन साठी व्यस्थ आहे. दरम्यान त्याला गेल्या काही दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. या पार्श्वभूमीवर त्याच्या सुरक्षेत कमालीची वाढ करण्यात आली आहे. या सर्व कारणात चिंतेत असताना सलमान खान वर दुःखाचं डोंगर कोसळलं आहे. सलमानच्या जवळच्या व्यक्तीचे निधन झाले असून त्याने एक फोटो त्याच्या समाज माध्यमांवर सामायिक केला.

सलमान खान त्याच्या समाज माध्यमांवर त्याच्या नवीन चित्रपटांबाबत सामायिक करत असतो तो त्याची खाजगी गोष्ट समाज माध्यमांवर सांगत नाही मात्र आता सलमानने श्रद्धांजलीचा फोटो शेअर केल्या मुळे चाहते चिंतेत पडले.सलमान खाननं पोस्ट शेअर करत लिहिलंय, “माझी प्रेमळ अद्दू. मी मोठा होत होतो तेव्हा ती तुच होतीस जी मला प्रेम देत होती आणि मला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करत होतीस. त्या सगळ्यासाठी तुझे खूप आभार. तू दिलेल्या अमाप प्रेमासाठी तुला खूप प्रेम. तुझ्या आत्म्यास शांती लाभो”.

मिळालेल्या माहितीनुसार ही महिला सलमान खानची आजी आहे. म्हणजेच सलमा खानची आई असून त्या ९१ वर्ष्याच्या होत्या. सलमान ची आजी ही त्याच्यासाठी खूप जवळची व्यक्ती होती.लहानपणी आजीने सलमान खानला खूप सांभाळले. त्यामुळे आजीच्या निधनाने सलमान भावुक झाला आहे. अनेक अभिनेत्यांसह चाहत्यांनी देखील कमेंट्स मधून श्रद्धांजली वाहिल्या.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number