मुंबई : राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या २४ सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद या सणाची सुट्टी सोमवार १६ सप्टेंबर २०२४ रोजी दर्शविण्यात आली होती. या सुटीत बदल करण्यात आला आहे. नव्या सरकारी अधिसूचनेनुसार ईदची सुटी सोमवार ऐवजी बुधवार १८ सप्टेंबर २०२४ रोजी असेल. पण रत्नागिरी आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांच्या प्रशासनाने अद्याप सुटीच्या बदलाचा आदेश जिल्ह्यात लागू केलेला नाही.
ईदच्या सुट्टीचा राज्यभरात घोळ
मुख्यमंत्र्यांनी सांगूनही जिल्हाधिकारी ऐकेनात
ईदची सुट्टी बुधवारी – शासनादेश
रत्नागिरी आणि संभाजीनगरचे प्रशासन ऐकेना
रत्नागिरी आणि संभाजीनगर इथं ईदची सुट्टी सोमवारीच

मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यात सोमवार, दि.१६ सप्टेंबर, २०२४ करिता घोषित केलेली ईद-ए-मिलाद ची सार्वजनिक सुट्टी रद्द करून ती आता बुधवार, दि. १८ सप्टेंबर, २०२४ या दिवशी जाहीर करण्यात आली असल्याची अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे. pic.twitter.com/El7UdYz1j8 — MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 14, 2024