नवाब मलिक प्रकरणात ईडीची छापेमारी

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असेलेले नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबईतील कुर्ला येथील गोवावाला कम्पाऊंडवर ईडीने छापेमारी सुरू केली आहे. ईडीचे आठ ते नऊ ईडीच्या अधिकाऱ्यांनी गोवावाला कंपाऊंडवर छापा टाकला आहे. तसेच सीआरपीएफचे कुमकदेखील मागवण्या आली आहेत. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने २३ फेब्रुवारी रोजी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री यांना अटक केली. दाऊद इब्राहिमच्या […]

नवाब मलिक प्रकरणात ईडीची छापेमारी

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असेलेले नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबईतील कुर्ला येथील गोवावाला कम्पाऊंडवर ईडीने छापेमारी सुरू केली आहे. ईडीचे आठ ते नऊ ईडीच्या अधिकाऱ्यांनी गोवावाला कंपाऊंडवर छापा टाकला आहे. तसेच सीआरपीएफचे कुमकदेखील मागवण्या आली आहेत.

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने २३ फेब्रुवारी रोजी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री यांना अटक केली. दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच केंद्रीय तपास यंत्रणाची कारवाई कायद्यानुसार असून उच्च न्यायालयाने नवाब मलिकांची याचिका फेटाळली.

मलिकांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

तसेच, ईडी न्यायालयाकडून मलिकांच्या कोठडीत ४ एप्रिलपर्यंत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे नवाब मलिकांना तुरुंगात बेड, अंथरूण आणि खुर्ची देण्यास न्यायालयाकडून परवानगी देण्यात आली आहे. तसेच नवाब मलिकांना मधुमेह असल्यामुळे कमी मिठाचे घरचे जेवण देण्याची विनंती मान्य करण्यात आली असून वैद्यकीय अहवाल आल्यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number