दक्षिण तुर्कीत ७.९ तीव्रतेचा भूकंप झाला असून प्रचंड नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या असून मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त होते आहे. या भुकंपामुळे तुर्कीत प्रचंड नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू दक्षिण तुर्कीत असून मृत्यूचा आकडा हजारोंच्या घरात जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय सिरीया, लेबनान, सायप्रस, जॉर्डन, इजिप्त, आणि इस्राएलला देखील भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. तुर्कस्तानच्या नुरदगीपासून २३ किमी पूर्वेला भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ७.८ इतकी मोजली गेली आहे. हा भूकंप दक्षिण तुर्कीमध्ये झाला. स्थानिक वेळेनुसार भूकंप पहाटे ४ वाजून १७ मिनिटांनी झाला.
तुर्कीच्या प्रशासनाने हाय अलर्ट दिला असून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहेत. इमारातींच्या ढिगाऱ्याखाली अनेक नागरिक दबले असल्याही भीती व्यक्त केली जात आहे. भूकंपाचे अनेक व्हिडिओ पुढे आले आहेत. यात मोठे नुकसान झाले असल्याचे दिसत आहे. येथील सनली उर्फ येथील महापौरने दिलेल्या महितीनुसार आतापर्यन्त ५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर १६ इमारती या कोसळल्या आहेत. यातील पहिला धक्का पहाटे ४:१७ वाजता जाणवला. ज्याची खोली सुमारे १७.९ किमी होती. पहिला धक्क्यानंतर ११ मिनिटाने ९.९ किमी अंतरावर ६.७ तीव्रतेचा आणखी एक भूकंपाचा धक्का जाणवलाय. या शक्तीशाली भूकंपामुळे तुर्कीतील अनेक इमारती अक्षरश: पत्त्यासारख्या कोसळल्या आहेत. यासह अनेक शहरांमधील घरांचं मोठ्याप्रमाणात नुकसान झालं आहे. तर मोठ्याप्रमाणात जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे मृतांचा आकडा हजारोंचा घरात जाण्याची भीती व्यक्त होतेय. या भूकंपानंतर ठिकठिकाणी बचावकार्य सुरु आहे.