एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रोपदी मूर्मु आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. दुपारी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या आमदार सोबत त्यांची बैठक होणार आहे. ही बैठक अंधेरी येथील हॉटेल लीला येथे होणार आहे.हॉटेल लीला येथे भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांसोबत बैठकीचे नियोजन करण्यात आले.द्रौपदी मुर्मू मुंबई मध्ये येऊन उद्धव ठाकरेंना भेट देणार का या कडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे. एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदे मध्ये सांगितले होते.आत्ता द्रौपदी मूर्मु या उद्धव ठाकरेंची भेट घेतील का असा प्रश्न निर्माण होत आहे. संजय राऊत यांनी एक वक्तव्य केले आहे त्यात ते असं म्हणाले आहेत कि, द्रौपदी मुर्मू मातोश्रीवर याव्यात म्हणून आम्ही त्यांना पाठींबा दिलेला नाही
येत्या काही दिवासात देशात राष्ट्रपतीपदासाठी निवडणूका पार पडणार असून, द्रौपदी मुर्मू यांना एनडीएकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर, विरोधी पक्षाकडून यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या सर्वामध्ये शिवसेनेकडून भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा केली आहे. आदिवासी समाजातील शिवसैनिकांनी विनंती केल्यानंतर आपण एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले .