खारघर टोलनाक्याजवळ मद्यधुंद ट्रकचालकाला टोलवरच्या कर्मचार्यांनी रोखले. त्याला ट्रक बाजूला लाव असं सांगत त्या ट्रकचालकाला समजावले जात होते. अचानकच मद्यधुंद चालकाने समोर थांबलेल्या टोल कर्मचार्यांमधून ट्रक दामटवण्याचा प्रयत्न केला. यात एका कर्मचाऱ्याला आपला जीव गमवावा लागला तर एक जण जखमी झाला आहे.शुक्रवारी मध्यरात्री 12:10 च्या सुमारास ही घटना घडली आहे. खारघर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, ट्रकचालक मात्र फरार झालेला आहे.
नेमक काय घडलं ?
शुक्रवारी पुण्याहून मुंबईच्या दिशेने ऑइलचा ट्रक घेऊन ट्रकचालक शिवप्रकाश सरज निघाला होता.
शुक्रवारी मध्यरात्री 12:10 च्या सुमारास ऑइल घेऊन जाणार्या मद्यधुंद ट्रकचालकाला टोलवरच्या कर्मचार्यांनी रोखले.
त्यामद्यधुंद चालकाने समोर थांबलेल्या टोल कर्मचार्यांमधून ट्रक दामटवण्याचा प्रयत्न केला.
सुपरवाझर प्रकाश जोशी याच्या अंगावरून ट्रक गेल्याने जागीच मृत्यू झाला तर री गोरख पाटील हा जखमी झाला.
खारघर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, ट्रकचालक मात्र फरार झालेला आहे.