‘मुघल आक्रमक, अत्याचारी नव्हते तर राष्ट्रनिर्माते होते’, असे वादग्रस्त वक्तव्य अभिनेता नसिरुद्दीन शाह यांनी केले आहे. नसिरुद्दीन शाह यांचे हे वक्तव्य चर्चेचा विषय ठरला आहे. नसिरुद्दीन यांच्या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आक्रमक झाले आहेत.
नसिरुद्दीन शाह यांनी ‘जातीय विद्वेष निर्माण करण्याचे काम करू नये’, असा सल्ला इशारा भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी दिला आहे.
नसरुद्दीन शाह म्हणाले, मुस्लिमांमध्ये भीती निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु देशातील मुस्लिम घाबरणार नाहीत. ते हार मानणार नाहीत. मुस्लिमांना याचा सामना करावा लागेल कारण आपल्याला आपले घर वाचवायचे आहे, मातृभूमी वाचवायची आहे, तसेच आपल्याला आपले कुटुंब आणि मुलांना वाचवायचे आहे. असे ते म्हणाले. तसेच देशात गृहयुद्धासारखे वातावरण निर्माण केले जात असल्याचाही दावा नसिरुद्दीन शाह यांनी केला आहे.