काही दिवसांवर गणपती बाप्पाचे आगमन होणार असून मुंबईतील काही पूल धोकादायक ठरवण्यात आले आहे. त्यातच सार्वजनिक गणपतीच्या आगमानासाठी मोठ- मोठी मिरवणूक काढली जाते. या मिरवणूकीत तरुणाई नाचताना दिसतात. त्यामुळे कमकुवत, जर्जर झालेल्या पुलांवर नाचू नये अशा सूचना मुंबईतील महापालिका प्रशासनाने गणेश मंडळांना केला आहे.
गणपतीच्या आगमानासाठी सगळेच उत्सुक असतात मात्र या उत्सुकता पायी मोठी दुर्घटना होऊ शकते असे महापालिकेने म्हटलं आहे.
त्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनाने गणेश मंडळांना सूचना दिल्या आहेत.
कमकुवत, जर्जर झालेल्या पुलांवर नाचू नका अशी सूचना देण्यात आली आहे.
नाच- गाण्यामुळे दाब येऊन पुलाचे नुकसान होऊ शकते असेही मुंबई महापालिकाने म्हटलं आहे.
तसेच गणेश भक्तांनी पुलावर जास्तवेळ रेंगाळू नये अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.
शांतपणे मिरवणूक पुल पार करावा अशी सूचना महापालिका प्रशासनाने गणेश मंडळाना केली आहे.