शिवसैनिकाला मारहाण केल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मात्र याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी नोटीस बजावली असून त्यांना चौकशीसाठी न्यायालयात बोलावले होते. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत पोलिसांवर निशाणा साधला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले की, केंद्रीय मंत्री नारायण राणे हे ज्येष्ठ नागरिक आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री नारयण राणे यांना पोलीस ठाण्यात साक्षीसाठी बोलाव कसे? असा सवाल उपस्थित करत राणेंना नियमबाह्य पद्धतीने पोलीस स्थानकात बोलवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
तसेच, सिंधुदुर्ग पोलिसांनी कायदा पाळायचा नाही, असे ठरवलेले दिसते. सीआरपीसी १६०ची नोटीस देणारे पोलीस जाणीवपूर्वक हे विसरले की ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीला पोलीस ठाण्यात साक्षीसाठी बोलविताच येत नाही. त्यांची साक्ष घरी जाऊनच घ्यावी लागते असेही त्यांनी ट्विट करत वकिली भाषेत पोलिसांना कायदा दाखवला आहे.
सिंधुदुर्ग पोलिसांनी कायदा पाळायचाच नाही, असे ठरवलेले दिसते!
CRPC 160 ची नोटीस देणारे पोलिस जाणीवपूर्वक हे विसरले की 65 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीला पोलिस स्टेशनमध्ये साक्षीसाठी बोलविताच येत नाही. त्यांची साक्ष घरी जाऊनच घ्यावी लागते.
(1/3)@MeNarayanRane #NarayanRane — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 30, 2021
नारायण राणेंना पोलीस ठाण्यात साक्षीसाठी बोलवणे हा कायदेशीर अपराध असल्यामुळे त्या पोलीस अधिकाऱ्यांवर आयपीसी १६६ए अंतर्गत एफआयआर नोंदविला जाईल तर असे न केल्यास भाजपा सीआरपीसी १५६(३) अंतर्गत खटला दाखल करले. आणि जर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशाने केले असे तर त्यांच्यावरसुद्धा आयपीसी ३४ अन्वये सहआरोपी बनविण्याची मागणी भाजप करणार असल्याचेही त्यांनी ट्विट करत सांगितले आहे.