मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध गायिका वैशाली भैसने-माडे यांनी नुकतीच एक धक्कादायक पोस्ट समाज माध्यमांवर लिहिली आहे. आपल्या जीवाला धोका असल्याची पोस्ट वैशालीने फेसबुकच्या अधिकृत अकाऊंटवरून शेअर केली आहे.
वैशाली भैसने-माडे यांनी पोस्टमध्ये लिहिले की, ‘काही लोकांकडून माझ्या जीवाला धोका आहे. माझ्या हत्येचा कट रचला जात आहे. त्यामुळे मी २ दिवसांनंतर पत्रकार परिषद घेऊन याचा गौप्यस्फोट करणार आहे. आज मला तुमच्या साथीची गरज आहे.’ वैशालीच्या धक्कादायक पोस्टनंतर चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून तीला सांभाळून राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
वैशाली भैसने-माडे यांच्या जीवाला धोका असल्यामुळे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वैशालीला भाजपचा पाठिंबा असल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले आहे. तसेच वैशाली भैसने-माडे यांना संरक्षण देण्याची मागणी चित्रा वाघ यांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे.