परबांची शापवाणी

किरीट सोमैया यांनी केलेले आरोप फेटाळत अनिल परब यांनी मंगळवारी ३१ जानेवारी २०२३ रोजी म्हाडा अधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीनंतर संतप्त अनिल परब यांनी सोमैयांना शाप दिला आहे. वांद्रे परिसरातील एका इमारतीच्या दरम्यान अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे’, असे आरोप भाजप नेते किरीट सोमैया यांनी उद्धव गटाचे आमदार अनिल परब यांच्यावर केले होते. सोमवारी ३० […]

परबांची शापवाणी

किरीट सोमैया यांनी केलेले आरोप फेटाळत अनिल परब यांनी मंगळवारी ३१ जानेवारी २०२३ रोजी म्हाडा अधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीनंतर संतप्त अनिल परब यांनी सोमैयांना शाप दिला आहे.
वांद्रे परिसरातील एका इमारतीच्या दरम्यान अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे’, असे आरोप भाजप नेते किरीट सोमैया यांनी उद्धव गटाचे आमदार अनिल परब यांच्यावर केले होते. सोमवारी ३० जानेवारी २०२३ रोजी संबंधित बांधकाम जमीनदोस्त केले गेले. त्यामुळे, मंगळवारी ३१ जानेवारी २०२३ रोजी अनिल परब यांनी म्हाडा अधिकाऱ्यांची भेट घेतली. तसेच, पाडल्या गेलेल्या बांधकामाशी आपला काहीही संबंध नाही, असे पत्रकही मिळवले. या भेटीनंतर, ‘सोमैया स्वत: लावलेल्या आगीत भस्मसात होतील’, अशी शापवाणी अनिल परब यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे.
तसेच, म्हाडा अधिकाऱ्यांवर निशाणा साधत ‘नोटीस पाठवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा’, अशी मागणीही अनिल परब यांनी केली आहे.

 

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number