अरमानच्या घरी पुन्हा हलला पाळणा

मुंबई , २७एप्रिल २०२३, प्रतिनिधी :युट्युबर अरमान मलिक आणि त्याच्या दोन बायका यांची नेहमीच समाज माध्यमांवर चर्चा सुरु असते. क्रितिका मलिक,पायल मलिक,आणि अरमान मलिक हे तिघेही युट्यूबर आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या व्हिडिओंची प्रचडं चर्चा सुरू असते.हे तिघेही त्यांच्या युट्युबवर त्यांची दिनचर्या चाहत्यांसोबत सामायिक करत असतात. व्हिडिओत हे तिघंही सुखानं नांदताना दिसतात. इतकंच नव्हे तर अरमानच्या […]

अरमानच्या घरी पुन्हा हलला पाळणा

मुंबई , २७एप्रिल २०२३, प्रतिनिधी :युट्युबर अरमान मलिक आणि त्याच्या दोन बायका यांची नेहमीच समाज माध्यमांवर चर्चा सुरु असते. क्रितिका मलिक,पायल मलिक,आणि अरमान मलिक हे तिघेही युट्यूबर आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या व्हिडिओंची प्रचडं चर्चा सुरू असते.हे तिघेही त्यांच्या युट्युबवर त्यांची दिनचर्या चाहत्यांसोबत सामायिक करत असतात. व्हिडिओत हे तिघंही सुखानं नांदताना दिसतात. इतकंच नव्हे तर अरमानच्या या दोन्ही बायका एकत्र गरोदर होत्या. त्यामुळं हे युट्यूबर्स चांगलेच चर्चेत आले आहेत.

अरमानच्या एका पत्नीने अगदी १५ दिवसांपूर्वीच ने बाळाला जन्म दिला होता, तिच्या मुलाचे नाव झैद मलिक आहे.क्रितिकाच्या प्रसूती नंतर चाहते पायलच्या प्रसूती वरून बरेच उत्सुक होते तर आता अरमनाच्या पहिल्या पत्नीने देखील आनंदाची बातमी दिली आहे. पायलने मुलगा आणि मुलगी अशा जुळ्या मुलांना जन्म दिला क्रितिकाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, अरमान आणि घरातील इतर सदस्य ‘मेरे घर नये मेहमान आ रहे’ हे गाणे गाताना दिसत आहेत. तर क्रितिकाने ‘पायल आई बनली आहे’, असे कॅप्शन देत हा व्हिडिओ शेअर केला. कृतिकाने ही बातमी शेअर केल्यानंतर चाहते त्यांच्या कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

दरम्यान अरमान त्याच्या दोन्ही पत्नींसोबत आनंदी जीवन जगत आहे, मात्र अनेकदा त्याच्या दोन पत्नी असल्यामुळे त्याला ट्रोल केले जाते. पायल ही अरमानची पहिली पत्नी आहे, तिला ७ वर्षांचा चिरायू नावाचा मुलगा आहे. अरमानने काही वर्षांनी पायलची मैत्रिण क्रितिकासोबत लग्न केले होते. नेटकऱ्यांनी त्यांना कितीही ट्रॉल केले तरी पायल आणि क्रितिका बऱ्याचदा व्हिडीओ मध्ये बहिणीं सारख्या राहताना दिसतात.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number