मराठी बोलण्यास सांगितल्यामुळे कुरिअर बॉयचा हल्ला

दादरमध्ये कुरिअर डिलिव्हेरी बॉयला मराठी बोलायला सांगितल्यामुळे दोन युवतींवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत कुरिअर डिलिव्हरी बॉयने एका तरूणीच्या चेहऱ्यावर पेनाने वार केले तर दुसऱ्या तरूणीच्या डोक्यात ठोसा मारला असल्याचे या तरूणींचे म्हणणे आहे. नेमकं काय घडलं ? दोन तरूणींनी कुरिअर बॉयला मराठी बोलण्यास सांगितले. मराठी बोलण्यास सांगितल्यामुळे कुरिअर बॉयला राग […]

मराठी बोलण्यास सांगितल्यामुळे कुरिअर बॉयचा हल्ला

दादरमध्ये कुरिअर डिलिव्हेरी बॉयला मराठी बोलायला सांगितल्यामुळे दोन युवतींवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत कुरिअर डिलिव्हरी बॉयने एका तरूणीच्या चेहऱ्यावर पेनाने वार केले तर दुसऱ्या तरूणीच्या डोक्यात ठोसा मारला असल्याचे या तरूणींचे म्हणणे आहे.

नेमकं काय घडलं ?

दोन तरूणींनी कुरिअर बॉयला मराठी बोलण्यास सांगितले.

मराठी बोलण्यास सांगितल्यामुळे कुरिअर बॉयला राग आला.

कुरिअर बॉयने रागाच्या भरात त्यांच्यावर हल्ला केला.

एका तरूणीच्या चेहऱ्यावर पेनाने वार केले तर दुसरी डोक्यात ठोसा मारला.

या तरूणींवर हल्ला झाल्यानंतर त्यांनी कुरिअर बॉयला शिवीगाळ केली.

या प्रकरणी दादरमधील शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनीता पेडणेकर आणि सुजाता पेडणेकर असे या तरूणींचे नाव आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number