राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. तर मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. दरम्यान मंत्रालयातही कोरानाने शिरकाव केला असून आता नागरिकांसाठी २४ तास ऑनड्यूटी काम करणाऱ्या पोलिसांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
नवी मुंबई पोलीस मुख्यालयात कोरोनाने शिरकाव केला असून नवी मुंबई पोलीस दलातील एकूण ७५ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण झालेल्या ७५ पोलिसकर्मींपैकी एकूण २० पोलीस अधिकारी आहेत.
राज्यात कोरोना रुग्ण वाढत असून नवी मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या २६२९वर पोहचल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. अशातच आता नवी मुंबई पोलीस दलात ७५ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेत काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.