पुण्यातील भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने एकनाथ खडसे यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधलेले नेते एकनाथ खडसे यांची भोसरी भूखंड प्रकरणी ईडीने अनेकदा चौकशी केली आहे. आणि अखेर न्यायालयाने खडसेंचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
देवेंद्र फडणवीस सरकारच्या वेळी एकनाथ खडसे महसूल मंत्रीपदावर विराजमान होते. त्यावेळी त्यांनी पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या नावे ३ कोटी ७५ लाखांचा जमिनीचा व्यवहार केला होता. मात्र ठाकरे सरकार आल्यानतंर पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन खरेदीत गैरव्यवहार केल्याचा आरोप खडसेंवर करण्यात आला. यासंबंधी संरंक्षणासाठी खडेसेंनी न्यायालयात धाव घेतली. आणि अखेर न्यायायलाने एकनाथ खडसेंचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे.