आयएनएस विक्रांत निधी घोटाळ्यात सोमय्यांविरोधात तक्रार?

महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना अडचणीत आणणारे भाजप नेते किरीट सोमय्या आता स्वत:च अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. किरीट सोमय्यांनी विक्रांत युद्धनौकेच्या नावावर ५८ कोटींची रक्कम लाटली असल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला आहे. याप्रकरणी आता, किरीट सोमय्या यांच्याविरोधात चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होण्याची शक्यता आहे. किरीट सोमय्यांनी आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी पैसे जमा केले […]

आयएनएस विक्रांत निधी घोटाळ्यात सोमय्यांविरोधात तक्रार?

महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना अडचणीत आणणारे भाजप नेते किरीट सोमय्या आता स्वत:च अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. किरीट सोमय्यांनी विक्रांत युद्धनौकेच्या नावावर ५८ कोटींची रक्कम लाटली असल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला आहे. याप्रकरणी आता, किरीट सोमय्या यांच्याविरोधात चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होण्याची शक्यता आहे.

किरीट सोमय्यांनी आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी पैसे जमा केले होते. पण ते पैसे राज्यपाल कार्यालयात पोहचले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे किरीट सोमय्यांनी विक्रांत युद्धनौकेच्या नावावर ५८ कोटींची रक्कम लाटली असल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला आहे.

आयएनएस विक्रांत निधी घोटाळा?

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी २०१४ साली विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी पैसे गोळा करण्याची मोहीम सुरू केली होती. या मोहिमेत ५७ ते ५८ कोटी रुपयांची रक्कम झाली होती. मात्र, रक्कम राजभवनापर्यंत पोहोचला नसल्याचं माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ही रक्कम किरीट सोमय्यांनी लाटली असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

सोमय्यांनी विक्रांत युद्धनौकेच्या नावावर लाटलेली रक्कम २०१४च्या निवडणूकीसाठी आणि त्यांच्या निकॉन इन्फ्रा कंपनीत वळवला आहे. हा घोटाळा म्हणजे किरीट सोमय्यांनी देशाच्या संरक्षण व्यवस्थेशी, राष्ट्रीय भावनेशी केलेली प्रतरणा आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी संजय राऊत यांनी केली आहे. तसेच महाराष्ट्रातील पोलीस याप्रकरणाची चौकशी करतीलच मात्र केंद्रीय तपास यंत्रणांनी नि:पक्षपातीपणे तपास करावा, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number