चांदीवाल आयोगाने राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समन्स बजावले आहे. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांच्याबाबत केलेल्या विधानाबाबत आयोगाने नवाब मलिक यांना समन्स पाठवले आहे. तर येत्या १७ फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचे आदेश चांदीवाल आयोगाने दिले आहेत.
सचिन वाझे यांनी चांदीवाल आयोगासमोर एक पत्रक सादर केले आहे. ज्यामध्ये नवाब मलिकांनी अँटिलिया स्फोटकांच्यामागे परमबीर सिंग आणि सचिन वाझे असल्याचे विधान केले. यामुळे मलिकांच्या या विधानांमुळे प्रतिमा खराब होत असल्याचा आरोप सचिन वाझे यांनी केला आहे. त्याचसंदर्भात आता चांदीवाल आयोगाकडून नवाब मलिकांना चौकशीसाठी समन्स बजावले आहेत.