मध्य रेल्वेवरील कसाऱ्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वे रुळाखाली खड्डा पडल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाल्याची माहिती समोर येत आहे.
मध्ये रेल्वेच्या कसारा आणि उंबरमाळी दरम्यान रुळाखाली खड्डा पडला होता. त्यामुळे कसाराहून मुंबई सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. ऐन गर्दीच्या वेळी रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाल्याने चाकरमान्यांचे हाल होताना दिसत आहे. रूळाखाली असलेला मातीचा भराव अचानक धसल्याने रूळा खाली मोठा खड्डा पडला होता. हा खड्डा तात्पुरता भरण्यात आला आहे.