अनिल देशमुखांना यांना सीबीआयने चौकशीसाठी समन्स बजावले

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. येत्या 14 एप्रिल रोजी चौकशीचे समन्स सीबीआयने बजावले आहे. परमबीर सिंग यांनी लावलेल्या कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी हे समन्स बजावण्यात आला आहे. त्यांना गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी हजर व्हावं लागणार आहे. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीसाठी […]

अनिल देशमुखांना यांना सीबीआयने चौकशीसाठी समन्स बजावले

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. येत्या 14 एप्रिल रोजी चौकशीचे समन्स सीबीआयने बजावले आहे. परमबीर सिंग यांनी लावलेल्या कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी हे समन्स बजावण्यात आला आहे.

त्यांना गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी हजर व्हावं लागणार आहे. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीसाठी पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याचा आरोप केल्यानंतर यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये परमबीर सिंग यांनी याचिका दाखल केली होती. याप्रकरणी अनेक नाव समोर आली होती मात्र या याचिकेवर सुनावणी होऊन सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांना मुंबई उच्च न्यायालयामध्ये यासंदर्भात दाद मागण्यासाठी सूचना केली होती.

त्यानंतर परमबीर सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देत मुंबई उच्च न्यायालयाने यासंदर्भात सीबीआयला प्राथमिक चौकशीचे आदेश देत या संदर्भातील अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार सीबीआयकडून आता या प्रकरणाचा तपास केला जात आहे. यापुर्वी देखील अनिल देशमुख यांच्या विरोधात अनेक आरोप राजकीय नेत्याकडून करण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number